योगगुरु बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

योगगुरु बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

योगगुरु बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

योगगुरु बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. राजस्थानातील बारमेर इथं एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुस्लिमांविरोधातील विधान केलं होते. बाडमेर येथील स्थानिक रहिवासी पठाई खान यांच्या तक्रारीच्या आधारे चौहतान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदेव बाबा यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 153ए, 295अ आणि 298 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुस्लिम आणि ख्रिश्चनांमधील काही लोकांना संपूर्ण जगाला त्यांच्या धर्मात घेण्याचं वेड लागलं आहे. पण हिंदू धर्म आपल्या अनुयायांना चांगलं वागण्यास शिकवतो. मुस्लिम लोक दिवसातून पाच वेळा नमाज पठण करतात त्यानंतर त्यांना पाहिजे ते करतात. ते हिंदू मुलींचं अपहरण करतात आणि त्यांच्यासोबत सर्व प्रकारचे पाप करतात. असे रामदेव बाबा यांनी म्हटले होते.

याचप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानातील चौहाटन पोलीस ठाण्यात १५३ अ अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com