ताज्या बातम्या
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली.
सतेज औंधकर, कोल्हापूर
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी गेले. याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
जुना राजवाडा पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेनंतर तब्बल 22 दिवसांनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुना राजवाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 326 (G), 324 (5) सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.