डिलाइल रोड पुलाचे उद्घाटन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल
लोअर परळ येथील डिलाईल रोडचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी यांनी उद्घाटन केल्याचा वाद चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाली आहे. आता मुंबई महानगरपालिकाही अॅक्शन मोडवर आली आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांकडून लोअर परळ पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर मात्र पालिकेने उर्वरित काम पूर्ण करण्याचा वेग वाढवला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीर रित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाईल रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले आणि या विरोधात गुन्हा दाखल झाली. एन एम जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेचे रोड डिपार्टमेंट कडून तक्रार दाखल करून इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून यासंबंधी आदित्य ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल झाली आहे.
या डिलाईल रोडवर इतर कामे अपूर्ण असताना आणि साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केलेले होतं. असं असताना अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.