छोटा राजनचे बॅनर लावणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल

छोटा राजनचे बॅनर लावणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मालाड पूर्व कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅनर लावून कबड्डीचे आयोजन करण्यात आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

रिध्देश हातिम, मुंबई

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मालाड पूर्व कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅनर लावून कबड्डीचे आयोजन करण्यात आले होते. छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेसाठी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी लोकांकडून पैसे उकळण्याचे काम केले असून कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी त्याची पावतीही दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यानंतर त्या सर्व जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेची कारवाई देखील करण्यात आली आहे. चौकशीत हे लोक छोटा राजनच्या नावाने हप्ता व खंडणी वसुलीचे कामही करत असल्याचे निष्पन्न झाले. छोटा राजनच्या फोटोसह पोस्टर व्हायरल झाल्यानंतर लगेचच कुरार पोलिसांनी कारवाई केली आणि त्याच्याशी संबंधित असलेल्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी सांगितले की, व्यापाऱ्याने आरोपीविरुद्ध कुरार पोलिस ठाण्यात पैसे उकळल्याची तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली असून छोटा राजनच्या नावावर या लोकांनी किती पैसे गोळा केले आणि त्यांचा छोटा राजनशी थेट संपर्क आहे का, याचा तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com