मुंबईच्या शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये आढळली मगर

मुंबईच्या शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये आढळली मगर

मुंबईच्या शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये मगर आढळल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईच्या शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये मगर आढळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने एका कर्मचाऱ्याने तिला आधीच पाहिले आणि पकडून एका ड्रममध्ये ठेवले.बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून मगर धरण तलावात आली असावी अशी शक्यता स्विमिंग पूलच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

जर कोणाला हे प्राणी चावले तर कोणाची जबाबदारी? जलतरण तलावाच्या बाजूलाच एक प्राणी संग्रहालय आहे. जे अनधिकृत आहे. त्यातून हे प्राणी बाहेर येतात. जलतरण तलावाच्या व्यवस्थापनान अनेक वेळा या संदर्भात तक्रार केली आहे, तिथे असल्या प्राण्यांना देखील अतिशय दूरावस्थेत ठेवले जाते. असा आरोप माध्यमाशी बोलताना संदिप देशपांडे यांनी केला आहे.

तर दुसरीकडे प्राणी संग्रहालयाचे संचालक युवराज मोघे यांनी हे सर्व आरोप फेटाळत हे मगरीचे पिल्लू आमच्याकडील नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान वन अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन मगरीचे पिल्लू आपल्या ताब्यात घेतले आणि शेजारील मरीन एक्वा झू प्राणी संग्रहालयाची देखील पाहणी केली.

याच पाहणीत या प्राणी संग्रहालयामध्ये बॉल पायथन प्रजातीचे अजगर वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले ज्या अजगराचे त्याला सांभाळण्याची परवानगीची कागदपत्रे या प्राणी संग्रहालयाकडे नसल्याने तो अजगर देखील वन अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतला आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे प्राणी संग्रहालय बेकायदेशीर असल्याने ते लवकरात लवकर कायदेशीर करावे किंवा बंद करावे अशी मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com