Lottery: मनमाडमधील ग्राहकाने जिंकली ७ लाख रुपयांची लॉटरी

Lottery: मनमाडमधील ग्राहकाने जिंकली ७ लाख रुपयांची लॉटरी

महाराष्ट्रातील मनमाड शहरातील ‘सप्तशृंगी लॉटरी सेंटर’मधून एका ग्राहकाने ‘राजश्री 20 वीकली लॉटरी’मध्ये सात लाख रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले आहे.
Published by :
Sakshi Patil

महाराष्ट्रातील मनमाड शहरातील ‘सप्तशृंगी लॉटरी सेंटर’मधून एका ग्राहकाने ‘राजश्री 20 वीकली लॉटरी’मध्ये सात लाख रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले आहे. या लॉटरीचा निकाल 24 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता जाहीर झाला.

‘राजश्री 20 वीकली लॉटरी’ ही ‘गोवा राज्य लॉटरी’द्वारे दररोज आयोजित करण्यात येणारी सरकारी लॉटरी आहे आणि पहिल्या बक्षीस व्यतिरिक्त, त्यात इतर अनेक बक्षिसे देखील आहेत.

विजेत्याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळाली नाही आहे, पण दुकानाचे मालक भास्कर सोनवणे म्हणाले की, “जेव्हा आमचे ग्राहक असे पुरस्कार जिंकतात, तेव्हा ही आमच्यासाठी आनंदाची बाब असते कारण आमच्या दुकानातून खरेदी केलेल्या लॉटरीमुळे एखाद्याचे जीवन बदलते, त्यांची स्वप्ने पूर्ण होतात."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com