Eagle Hits Train Windscreen : वेगाने उडत्या गरुडाची धावlत्या ट्रेनवर झेप! थेट काच फोडून चालकाच्या केबिनमध्ये; मोठा अनर्थ टळला

Eagle Hits Train Windscreen : वेगाने उडत्या गरुडाची धावlत्या ट्रेनवर झेप! थेट काच फोडून चालकाच्या केबिनमध्ये; मोठा अनर्थ टळला

पक्ष्यांची विमानांना धडक बसल्याची घटना अनेकदा कानावर पडलं आहे. मात्र जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर-अनंतनाग मार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

पक्ष्यांची विमानांना धडक बसल्याची घटना अनेकदा कानावर पडलं आहे. मात्र जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर-अनंतनाग मार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्याने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. एका गरुडाची थेट ट्रेनला धडक लागली आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी सकाळी विचित्र घटना घडली.

बारामुल्ला ते बनिहाल जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 74626 च्या पुढच्या काचेवर गरुड इतक्या वेगाने आदळला की ट्रेनची काच फुटली आणि थेट तो लोको पायलटच्या केबिनमध्ये घुसला, ज्यामुळे लोको पायलटला दुखापत झाली. धडकेचा जोर इतका होता की काच फुटली आणि लोको पायलटच्या चेहऱ्यावर आणि हाताला किरकोळ जखमा झाल्या.

यावेळी काचा फुटल्यामुळे लोको पायलटला तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी ट्रेन थांबवली. लोको पायलटला अनंतनाग रेल्वे स्टेशनवर प्रथमोपचार दिले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सुदैवाने, सर्व प्रवासी सुरक्षित असून मोठा अनर्थ टळला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात एका वेगळ्या घटनेची नोंद झाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com