Yamuna River : भाजपने मोदींसाठी बनवली फिल्टर पाण्याची नकली यमुना; आम आदमी पक्षाने केला व्हिडीओ शेअर
थोडक्यात
भाजपने मोदींसाठी बनवली फिल्टर पाण्याची नकली यमुना
पंतप्रधान मोदींच्या छठस्नानासाठी नकली यमुना
यमुनेत सोडण्यात आले फिल्टर पाणी
( Yamuna River) पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत वासुदेवघाट परिसरात पहाटे छटपूजेत सहभागी होणार आहेत. मोदींच्या छठस्नानासाठी कृत्रित यमुना तयार करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
दिल्लीत वासुदेव घाटावर नकली यमुना बनविण्यात आली. या नकली यमुनेत फिल्टर पाणी सोडण्यात आले, वासुदेव घाटात भराव टाकून यमुनेच्या मुख्य प्रवाहापासून तोडला.भरावाच्या दुसऱ्या टोकाला स्वतंत्र जलाशय तयार केला.
या जलाशयात गंगेचे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी वजिराबाद जलशुद्धीकरण केंद्रात फिल्टर केललं असल्याचे सांगण्यात येत आहे. आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडियावर बनावट यमुनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओची आता चर्चा रंगली असून यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.
