Mumbai Airport Cocaine Seizure : मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई, साडेआठ कोटींचं कोकेन जप्त
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून महसूल गुप्तवार्ता विभागाच्या DRI अधिकाऱ्यांनी एका परदेशी नागरिकाला ६७४ ग्रॅम कोकेनसह अटक करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कारवाईमध्ये सापडलेल्या कोकेनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे पावणे आठ कोटी इतकी आहे. त्या परदेशी नागरिकांवर अमलीपदार्थ प्रतिबंधित कायद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परदेशी नागरिकाने कोकेन पोटात लपवले
लिबेरिया इथून भारतात आलेल्या प्रवाशाकडे ६७४ ग्रॅम कोकेनचा साठा सापडल्याने मुंबई विमानतळावर एकच खळबळ उडाली. त्या परदेशी नागरिकाच्या वेगळ्या हालचालीमुळे डीआरआय Directorate of Revenue Intelligence च्या अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याची चौकशी केली असता,त्या व्यक्तीच्या पोटामध्ये पिवळ्या रंगाच्या अनेक कॅप्सूल सापडल्या. प्रशिक्षित डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली ह्या कॅप्सूल काढून त्यातील पदार्थांची तपासणी करण्यात आली आणि तो पदार्थ कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. हे कोकेन महसुल गुप्त वार्ता विभागाच्याअधिकाऱ्यांनी जप्त केले. या कोकेनची एकूण किंमत ७ कोटी ७५ लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.