ताज्या बातम्या
Kerala News : केरळच्या समुद्रात परदेशी जहाज पलटलं, 24 जणांना सुखरूप वाचवण्यात तटरक्षक दलाला यश
केरळमधील कोचीजवळच्या समुद्रात एक परदेशी जहाज बुडालं असून तटरक्षक दलाने त्वरित जहाजातील 24 जणांना वाचवले आहे.
केरळमधील कोचीजवळच्या समुद्रात एक परदेशी जहाज बुडालं असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, तटरक्षक दलाने त्वरित मोर्चा सांभाळून जहाजातील 24 जणांना वाचवले आहे. प्राथमिक माहितीनुसार हे मालवाहू जहाज लायबेरियाचे असून, 184 मीटर लांबीचं आणि लायबेरियाचा झेंडा असलेलं के कंटेनर जहाज एमएससी ईएलएसए 3, 24 मे रोजी कोची येथे पोहोचलं होतं.
तिथून ते 23 मे रोजी विझिंगम बंदरातून रवाना झालं. 24 मे रोजी सुमारे 1 वाजून 25 मिनिटांनी मेसर्स एमएससी शिप मॅनेजमेंटने भारतीय अधिकाऱ्यांना कोची येथून सुमारे 38 नॉटिकल मैल दक्षिण पश्चिमेला आपल्या जहाजावर 26 डिग्रीच्या लाटा उसळल्याची माहिती दिली आणि त्वरित मदतीची मागणी केली.