Mumbai Hightide : मुंबईमध्ये हायटाइड जारी! समुद्रात मोठ्या भरतीचा इशारा
मुंबई सह उपनगरांमध्ये आज पहाटे पासुनच पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. विजेच्या कडकडाटासह मुंबईत मान्सूनचे आगमन झाले असुन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन महानगर पालिकेने केले आहे. मान्सुन यंदा तब्बल 12 ते 15 दिवस आधीच मुंबईसह महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. मुंबईत पहाटेपासुनच पावसाचा जोर कायम आहे. पुढील चार ते पाच तासात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबई आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला असुन मुंबई सह पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस चालूच राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक वातावरण मिळाले आहे. तसेच आज समुद्रात दुपारी 12 ते 12:30 च्या सुमारास समुद्रात मोठी भरती येणार असुन 4.75 किमी उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावेळेस 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मच्छीमारांना आणि किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अलीबाग सह कोकण किनारपट्टीवर 18 दिवस समुद्राला उधाण येणार असुन त्याव वेळी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीच्या वेळी जर मोठा पाऊस झाला तर मुंबई ची वाहतुक व्यवस्था कोलमडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.