Jejuri Accident: भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू, भरधाव स्विफ्ट कारची टेम्पोला जोरदार धडक
Jejuri Accident: भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू, भरधाव स्विफ्ट कारची टेम्पोला जोरदार धडकJejuri Accident: भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू, भरधाव स्विफ्ट कारची टेम्पोला जोरदार धडक

Jejuri Accident : भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू, भरधाव स्विफ्ट कारची टेम्पोला जोरदार धडक

जेजुरी अपघात: भरधाव स्विफ्ट कारने टेम्पोला जोरदार धडक दिल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू.
Published by :
Riddhi Vanne
Published on

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. एका भरधाव स्विफ्ट कारने पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. मृतांमध्ये एका महिलेसह, हॉटेलचा मालक, टेम्पोतील साहित्य उतरवणारे कर्मचारी आणि कारमधील काही प्रवाशांचा समावेश आहे. तसेच 2 मुलांसह दोनजण गंभीर जखमी झाले.

ही दुर्घटना सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीसमोरील श्रीराम हॉटेलजवळ घडली. यावेळी पिकअप टेम्पोमधील साहित्य हॉटेलमध्ये उतरवण्याचे काम सुरू होते. दरम्यान, जेजुरीहून इंदापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने थेट टेम्पोला धडक दिली. या भीषण धडकेत टेम्पोच्या आजूबाजूला असलेले साहित्य उतरवणारे, हॉटेल मालक आणि कारमधील प्रवासी असे आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात दोन मुले, एक महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे. अपघातामुळे काहीवेळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.

मयताची नावे खालील प्रमाणे

1 )सोमनाथ रामचंद्र वायसे राहणार नागरिक तालुका पुरंदर जिल्हा पुणे

2) रामू संजीवनी यादव राहणार नागरिक तालुका पुरंदर जिल्हा पुणे

3 अजय कुमार चव्हाण राहणार उत्तर प्रदेश

4) अजित अशोक जाधव राहणार कांजळे कांजळे तालुका भोर जिल्हा पुणे

5) किरण भारत राऊत किरण भारत राऊत राहणार पवारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे

6) अश्विनी संतोष एस आर राहणार सोलापूर

7) अक्षय संजय राऊत राहणार झारगडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे

8) एक अनोळखी पुरुष असे मयत झालेले आहेत

हेही वाचा...

Jejuri Accident: भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू, भरधाव स्विफ्ट कारची टेम्पोला जोरदार धडक
Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं! धार्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला शॉक देऊन संपवलं, थक्क करणारे कारण समोर
Jejuri Accident: भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू, भरधाव स्विफ्ट कारची टेम्पोला जोरदार धडक
Bhandup MNS Rada : पुस्तक जाळलं! अन् मनसेचा भडका उडाला, थेट दुकानात जाऊन...
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com