कुंभमेळा चेंगराचेंगरी दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार
प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली . प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. अमृत स्नानाच्या मौनी अमावस्येच्या आधी ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी होणार असून महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यांच्या न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हर्ष कुमार या आयोगाचे प्रमुख असून यामध्ये माजी पोलीस महासंचालक व्ही. के. गुप्ता आणि निवृत्त आयएएस अधिकारी डी. के. सिंह यांचा देखील समावेश आहे. हा आयोग आज शुक्रवारी घटनास्थळी भेट देणार असून या घटनेच्या चौकशीसाठी आयोगाला महिन्याची मुदत देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.