Ind Vs Pak War : जम्मू-कश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-कश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी ठार झाला आहे.
Published by :
Prachi Nate

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान येथे पहाटे चकमक झाली होती. शोपियानमध्ये झालेल्या चकमकी दरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे.

याचपार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. या भागात आणखी दहशतवादी लपल्याची बातमी समोर आली आहे. शोपियानच्या झिनपथेर केलर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी ठार झाला आहे. दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये सध्या गोळीबार सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com