Space object fallen in Buldhana
Space object fallen in Buldhana

बुलढाण्यात आकाशातून शेतात पडलं यंत्र, काय आहे हा प्रकार?

बुलढाणा जिल्ह्यात आकाशातून शेतात पडलं यंत्र, नेमका काय आहे हा प्रकार? या विषयी जाणून घेऊया.
Published by :
Published on

बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अचानक शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून एक वस्तू पडली. शेतकरी श्रीकांत बदामे यांच्या शेतात ही वस्तू पडली आहे. यामुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली. ही वस्तू नेमकी आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. शेतकरी श्रीकांत बदामे यांचा मुलगा महेश बदामे यांनी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं?

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर जवळ चायगाव शिवारातून एक अजब घटना घडली. शेतकरी श्रीकांत बदामे यांच्या शेतात आकाशातून एक वस्तू पडली. एका मोठ्या फुग्याला बांधलेली ही वस्तू होती. आकाशातून अचानक ही वस्तू पडल्याने यामुळे खळबळ उडाली आहे. यानंतर

4 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीकांत बदामे आणि त्यांचा मुलगा महेश श्रीकांत बदामे हे शेतात गेले होते. त्यांना ही वस्तू पडताना दिसली. हे नेमकं काय आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला. हे एक यंत्र होतं. तेव्हा त्यांनी या यंत्रावर कोरियन सरकारद्वारा लिहिलेले गुगल ट्रान्सलेट करून वाचले. ही मशीन कोरिया सरकारच्या हवामान खात्याची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

काय लिहिलं होतं यंत्रावर?

हे यंत्र (Machine) कुठे पडली असता ही कचरा समजून फेकून द्यावी अशा प्रकारचे मजकूर त्यावर लिहिलेले असल्याचे महेश बदामे यांनी सांगितले आहे. त्यांनी तशी माहिती देत दरम्यान हे यंत्र खरच कोरीयन हवामान खात्याचे आहे का याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र, यंत्रावर कोरियन भाषेतील मजकूर असून या यंत्रांची निर्मिती कोरियामध्ये झाल्याचा उल्लेख आहे. दरम्यान, शेतकरी श्रीकांत बदामे यांचा मुलगा महेश श्रीकांत बदामे यांनी पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाला या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com