ताज्या बातम्या
Uddhav Thackeray VS MNS : पुण्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
शिवसेना धक्का: पुण्यात किशोर दुर्वे शेकडो समर्थकांसह मनसेमध्ये सामील
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आगामी येणाऱ्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना रंगल्या होत्या. मात्र आता पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. घोरपडी गाव शाखाप्रमुख किशोर दुर्वे आणि शेकडो समर्थकांनी मनसे पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राजमहल निवासस्थानी पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. या भव्य प्रवेश सोहळ्यावेळी मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते. किशोर दुर्वे यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा केली.