सोलापूर एमआयडीसी परिसरातील रबर फॅक्टरीला भीषण आग
Admin

सोलापूर एमआयडीसी परिसरातील रबर फॅक्टरीला भीषण आग

सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका रबर गारमेंट फॅक्टरीला मोठी आग लागली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका रबर गारमेंट फॅक्टरीला मोठी आग लागली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली आहे.

या आगीमुळे परिसरात धुराचे काळे लोट पसरले आहे. अजूनही ही आग आटोक्यात आली नसल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाचे ५० हून अधिक बंब दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळालेली नाही आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com