Badlapur Fire: बदलापूरमधील शिरगाव परिसरातील वेदांत वाटिका इमारतीला लागली भीषण आग

Badlapur Fire: बदलापूरमधील शिरगाव परिसरातील वेदांत वाटिका इमारतीला लागली भीषण आग

बदलापूरातील शिरगावमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या इमारतीला शनिवारी दुपारी (16/03/2024) आग लागल्याची घटना घडली.
Published by :
Sakshi Patil

बदलापुरातील शिरगावमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या इमारतीला शनिवारी दुपारी (16/03/2024) आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घराला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

बदलापूरच्या शिरगाव परिसरात वेदांत वाटिका या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घराला भीषण आग लागली होती. घराला लागलेल्या आगीत घरातील वस्तूंचे खुप नुकसान झाले असून या लागलेल्या आगीमुळे परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होत.

आग लागल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेस्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आग नेंमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com