State Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; नेमके कोणकोणते निर्णय घेण्यात आले?
आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळांची बैठक पार पडली असून यावेळी बैठक निर्णयांचा धडाका पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत राज्यात होणारा मुसळधार पाऊस तसेच शेतीच्या पेरणीची स्थिती यावर चर्चा झाली.
निधी वाटपावरुन तसेच नव्या जबाबदारी आणि नियुक्त्यांबाबतही चर्चा झाली. त्याचसोबत कोणालाही निधी कमी पडणार नाही निधी सगळ्यांना मिळणार असल्याचं निधीवाटपाबाबत एकनाथ शिंदेंनी सर्व मंत्र्यांना अश्वासन दिले आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींबाबतही या बैठकीत चर्चा झाली.
तसेच धारावीत प्रकल्पात भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला. बांदा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर विरार-अलिबाग कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.