देशात नवीन संविधान लिहलं जात आहे; अबू आझमी यांच खळबळजनक वक्तव्य

देशात नवीन संविधान लिहलं जात आहे; अबू आझमी यांच खळबळजनक वक्तव्य

समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी काल अमरावती दौऱ्यावर होते, दरम्यान त्यांनी अमरावतीच्या जमिल कॉलनी येथे मुस्लिम भागात जाहिर सभा घेतली.

सुरज दहाट, अमरावती

समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी काल अमरावती दौऱ्यावर होते, दरम्यान त्यांनी अमरावतीच्या जमिल कॉलनी येथे मुस्लिम भागात जाहिर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत खळबळजनक व्यक्तव्य केलंय, देशात नवीन संविधान लिहणे सुरू आहे, तसेच नवीन संसद, राष्ट्रपती भवन,पंतप्रधान निवास तयार करणे सुरू आहे त्यामुळे जुनी संसद पाडण्याला विरोध केला पाहिजे या विरोधात उभे राहिले पाहिजे असं आवाहन समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केलं. सर्वांच्या खात्यात 15 लाख रुपये पंतप्रधान मोदी टाकणार होते, दोन करोड नौकऱ्या देणार होते दिल्या नाही. देशात बेरोजगारी वाढली आहे तर देश बरबाद होत आहे याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे अशी टीकाही आझमी यांनी केली

तर अमरावतीत अलीकडे भाजपने लव्ह जिहादचे अनेक आरोप केले याचा देखील समाचार आमदार अबू आझमी यांनी घेतला,18 वर्षा नंतर कोणीही कोणाशी लग्न करू शकते, अमरावतीच्या धारणीमध्ये लव्ह जिहादचा आरोप केला होता यातील हिंदू मुलगी उच्चशिक्षित होती लग्न लावत असताना तिने का तिथे वाचलं नाही लग्न लावून देणारा देशमुख होता तर मुलीवर दबाव टाकून मुस्लिम मुलांना फसवण्याचा हा डाव आहे,मुलींना धमकावून विरोधात बोलायला लावलं जात, तर मुस्लिमांना फसवण्यासाठी टार्गेट केल जात आहे असा पलटवार आमदार अबू आझमी यांनी केला,यात मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी हस्तक्षेप करायला पाहिजे असंही ते म्हणालेत

Lokshahi Marathi
www.lokshahi.com