बलात्कारीत आरोपीकडून सत्येंद्र जैन यांना मसाज ट्रीटमेंट, नव्या व्हिडीओने आप अडचणीत?
Admin

बलात्कारीत आरोपीकडून सत्येंद्र जैन यांना मसाज ट्रीटमेंट, नव्या व्हिडीओने आप अडचणीत?

मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन हॉटेलचे जेवण खाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ जारी करताना भाजपने म्हटले की, हे जेल नसून रिसॉर्टसारखे दिसते. त्याचवेळी, या व्हिडिओने सत्येंद्र जैन यांच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत ज्यात त्यांनी म्हटले आहे की त्यांना योग्य आहार दिला जात नाही.

या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन यांच्या पलंगावर तीन वेगवेगळे बॉक्स दिसत आहेत, ज्यामध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवलेले आहेत. यासोबतच सत्येंद्रही फळं खाताना दिसत आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांचे वजन 8 किलोने वाढले आहे तर तुरुंगात असताना त्यांचे वजन 28 किलोने कमी झाल्याचा दावा त्यांच्या वकिलाने केला आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com