मध्यप्रदेशात मंदिराच्या घुमटाला विमान धडकलं, पायलटचा जागीच मृत्यू

मध्यप्रदेशात मंदिराच्या घुमटाला विमान धडकलं, पायलटचा जागीच मृत्यू

मध्यप्रदेशात मंदिराच्या घुमटाला विमान धडकलं असल्याची माहिती मिळत आहे.

मध्यप्रदेशात मंदिराच्या घुमटाला विमान धडकलं असल्याची माहिती मिळत आहे. या विमान अपघातात पायलटचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच या अपघातात एक ट्रेनी गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान ही दुर्देवी घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. चोरहटा विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतलं होतं. मात्र, दाट धुक्यांमुळे विमान खालीच राहिलं. ते अधिक उंचावर उडू शकलं नाही. यावेळी या विमानाने आधी एका आंब्याच्या झाडाला धडक दिली. त्यानंतर हे विमान मंदिराच्या घुमटाला जाऊन धडकलं आणि क्रॅश झालं.

या जखमींना तात्काळ संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यातील चोरहटा येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाला. हे विमान पाल्टन प्रशिक्षण कंपनीचं असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मंदिराच्या घुमटाला विमानाने धडक दिल्यानंतर या मंदिराचा घुमट कोसळून पडला. एवढेच नव्हे तर ही धडक एवढी जोरदार होती की विमानाचे पातेच उडून पडले. तसेच विमानाचा काही भाग चक्काचूर झाला. 

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com