Kerala : गळ्यात पट्टा, जमिनीवरील नाणी चाटण्यास पाडले भाग! केरळमधील 'तो' व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
केरळमधील एका खासगी मार्केटिंग कंपनीतील संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून केरळमधील एका खाजगी मार्केटिंग कंपनीत व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्याला थेट श्वानासारखी वागणूक देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या गळ्यात दोरी बांधून कुत्र्याप्रमाणे गुडघ्यावर रांगण्यास सांगितले तसेच त्यांना जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडले आहे. एवढचं नव्हे तर कर्मचाऱ्यांना आधी अर्ध नग्न केलं. नंतर त्यांच्या गळ्यात पट्टा बांधून प्राण्यासारखं गुडघ्यावर रांगायला लावलं.
तसेच जमिनीवर ठेवलेल्या भांड्यातून प्राण्यासारखं पाणी प्यायला लावलं अशा प्रकारची अमानुष वागणूक आणि छळ केला आहे. टार्गेट पुर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मालकांकडून मिळालेल्या शिक्षेचा एक भाग असल्याचे म्हटलं जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केरळचे कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी या घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. तसेच केरळमध्ये एकच खळबळ उडाली असून नेटकऱ्यांकडून याविषयी संताप व्यक्त केला जात आहे.