Satara Accident : उज्जैनच्या यात्रेवर निघालेल्या भाविकांच्या खासगी बसचा भीषण अपघात

Satara Accident News : उज्जैनच्या यात्रेवर निघालेल्या भाविकांच्या खासगी बसचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू , अनेक जखमी

सातारा अपघात: उज्जैन यात्रेवर निघालेल्या बसला ट्रकची धडक, तीन मृत्यू, अनेक जखमी.
Published by :
Team Lokshahi
Published on

सातारा Satara जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सालपे घाटात रविवारी मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. इचलकरंजीहून उज्जैनला निघालेल्या भाविकांच्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसचालक आणि दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात रविवार रात्री अंदाजे २.३० वाजण्याच्या सुमारास सालपे घाटातील बिरोबा मंदिराजवळ घडला. इचलकरंजी येथून महिलांचा एक भाविक समूह उज्जैनला देवदर्शनासाठी निघाला होता. त्यांची बस (MH 04 CP 2452) वाठार स्टेशन मार्गे सालपे घाट उतरत असताना, लोणंदहून साताराच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने (MH 42 BF 7784) वळणावर बसला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णवाहिकेतून साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. एक महिला गंभीर जखमी होती, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, भाविकांच्या यात्रेवर दु:खाचा अंधार पसरला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी पुढाकार घेतल्याने अनेकांचे जीव वाचले. लोणंद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. उज्जैनच्या यात्रेवर निघालेल्या या भाविकांच्या बसचा प्रवास अपघातात दुर्दैवी ठरला आणि तिघांना प्राणास मुकावे लागले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com