Sharad Pawar NCP Protest : मंत्रालय परिसरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन
Sharad Pawar NCP Protest : मंत्रालय परिसरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलनSharad Pawar NCP Protest : मंत्रालय परिसरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन

Sharad Pawar NCP Protest : मंत्रालय परिसरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन

फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला न्याय मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले. "संपदा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे!" अशा घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला न्याय मिळावा.

  • या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले.

  • आंदोलनादरम्यान पोलिसांनी मेहबूब शेख आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Sharad Pawar NCP Protest : फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला न्याय मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले. "संपदा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे!" अशा घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला. महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी मेहबूब शेख आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मंत्रालय परिसरातच आंदोलन झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि पोलिसांना मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त करावा लागला.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, “संपदा मुंडे हिला मृत्यूनंतरही तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत, हे अत्यंत अन्यायकारक आहे. तिच्या मृत्यूच्या चौकशीत अनेक संशयास्पद बाबी आहेत. ते हॉटेल रणजीत निंबाळकर यांच्या संबंधीतआहे तर संपदा यांच्या हस्ताक्षरावरही शंका उपस्थित केली जात आहे .” दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून मुंडे कुटुंबाशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनानंतर या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने होईल का आणि सरकारकडून ठोस पाऊल उचलले जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाचा सविस्तर व्हिडिओ आपण इथे पाहू शकता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com