ताज्या बातम्या
Bhiwandi Metro Accident : रिक्षातील प्रवाशावर काळाचा घाला! मेट्रो साइटवरील सळई थेट डोक्यातून आरपार; दृश्य पाहून तुमचाही उडेल थरकाप
भिवंडीत मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू असताना एक सळई थेट वरून पडली ती खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षांवर आदळून रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली.
भिवंडीत दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे. नारपोली ते धामणकर नाका या दरम्यान सुरू असलेल्या ठाणे भिवंडी या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू असताना एक सळई थेट वरून पडली ती खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षांवर आदळून रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली. या अपघाताने प्रवासी रक्तबंबाळ झाला असून या गंभीर दुखापती नंतर ही तो शुद्धीत राहिला आहे.
सोनू अली, वय 20 रा.विठ्ठलनगर असे जखमी युवकाचे नाव आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमी सोनू अली या अंजूरफाटा येथील नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान हा अपघात कोणाच्या चुकीमुळे की कसा घडला याबाबत अधिक तपास स्थानिक भोईवाडा पोलिस करीत आहेत.