Sanjay Raut : एक रिक्षावाला, आज 5 लाख कोटींचा मालक, कोणामुळे ? राऊतांनी शिंदेंना सुनावलं

Sanjay Raut : एक रिक्षावाला, आज 5 लाख कोटींचा मालक, कोणामुळे ? राऊतांनी शिंदेंना सुनावलं

शिवसेना शिंदे गटा दसरा मेळावा काल मुंबईत झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. तसेच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीचा विषय चर्चेत आहे, शक्यताही व्यक्त होत आहेत. यावर एकनाथ शिंदे काल म्हणाले की कोण कोणाशी मनोमिलन करतंय याची चिंता करू नका.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • शिवसेना शिंदे गटा दसरा मेळावा काल मुंबईत झाला.

  • शिंदेंच्या या टीकेचा संजय राऊत यांनी खरपूस समाचारा घेतला

  • राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीचा विषय चर्चेत

शिवसेना शिंदे गटा दसरा मेळावा काल मुंबईत झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. तसेच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीचा विषय चर्चेत आहे, शक्यताही व्यक्त होत आहेत. यावर एकनाथ शिंदे काल म्हणाले की कोण कोणाशी मनोमिलन करतंय याची चिंता करू नका. सगळ्यांचे हिशोब आमच्याकडे आहे, योग्यवेळेस त्यांचा समाचार घेऊ. मात्र आता शिंदेंच्या या टीकेचा संजय राऊत यांनी खरपूस समाचारा घेतला. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याचा विडा अमित शहांनी उचलला आहे आणि मुंबई अडानीसारख्या उद्योगपतीला विकण्याचा चंग बांधला आहे, त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडेपुसे आहेत अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

काय म्हणाले संजय राऊत ?

एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया किंवा बॅरिस्टर पै नाहीत. एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या बेनामी कंपनीचे इकडचे ब्युरो चीफ आहेत. त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली आहे ती बोगस आहे, उद्या जेव्हा सरकार जाईल त्या बेनामी कंपंनीचं तेव्हा सगळ्या चौकश्या होतील. ते असं काल म्हणले की मराठी माणूस शिवसेनेमुळे, ठाकऱ्यांमुळे हद्दपार झाला. अशा प्रकारे जर वक्तव्य केलं असेल तर आधी आरशात पाहिलं पाहिजे. जे आमदार तुमच्यासोबत पळून गेले, शिवसेनेमुळे त्यांची किंमत 50-100 कोटी झाली, त्या मराठी माणसांची. सूरतला, गुवाहाटीला कोण पळून गेलं ? हे पळपुटे आहेत. काहीही बोलायचं, उचलली जीभ लावली टाळ्याला, लिहून दिलेली भाषणं वाचायची, अशा शब्दांत राऊतांनी शिंदेंवर टीकास्त्र सोडलं.

मुंबईतला, ठाण्यातला, महाराष्ट्रातला मराठी माणूस आजही एका श्रद्धेनं, निष्ठेने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासोबतच आहे. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याचा विडा अमित शहांनी उचलला आहे आणि मुंबई अडानीसारख्या उद्योगपतीला विकण्याचा चंग बांधला आहे, त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडेपुसे आहेत. अमित शहांनी मुंबईत ज्या प्रकारचं राजकारण सुरू केलं आहे, मराठी माणसापासून तोडण्याचं, त्याचा निषेध करण्याची हिंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे का ? नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये , असंही राऊत म्हणाले.

एक रिक्षावाला, आज 5 लाख कोटींचा मालक, कोणामुळे ?

उद्धव ठाकरे हे ‘कट’प्रमुख असल्याची टीका काल एकनाथ शिंदे यांनी केली होती. एकाल खुर्चीसाठी सगळं गमावलं असंही ते म्हणाले होते. त्यावरही राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलं. आम्ही आहोत कटप्रमुख. आम्ही काहीही गमावलं नाही. हे नेते कोण ? त्यांना उद्धव ठाकरे यांनीच नेता केला, तेही आमच्या आग्रहामुळेच. यांना बाळासाहेब ठाकरेंनी नेता केलेलं नाही. तुमच्यासारखा एक रिक्षावाला, आज 5 लाख कोटींचा मालक झाला. एका वेळेला 50-50 कोटी रुपये निवडणुकीवर उधळतो, हे उद्धव ठाकरेंमुळेच शक्य आहे ना. नाहीतर तुम्ही कोण होतात ? याचं आत्मचिंतन केलं पाहिजे असं राऊतांनी शिंदेंना सुनावलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com