Eknath Shinde : केंद्रीय सहकार मंत्रालयामुळे सहकाराचे प्रश्न सुटले- एकनाथ शिंदे

सहकार सक्षमीकरण: एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कार्याचे कौतुक केले.
Published by :
Riddhi Vanne

मुंबईमध्ये राज्य सहकारी बॅंकेच्यावतीने आज म्हणजेच 12 मे रोजी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सहकाराचे सक्ष्मीकरण आणि राज्यशासनाचे धोरण या विषयावर परिसंवादात करण्यात आला. या परिसंवादामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप दिघे असे अनेक राजकीय नेते उपस्थितीत होते.

या परिसंवादामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत होते. त्यांनी कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांच्या संबोधले होते. भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, "सहकार हा विकासाचा मार्ग आहे. विना सहकार, नाही उद्धार हे आपलं ब्रीदवाक्य आहे. अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाली. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर 1960 मध्ये अधिनियम संस्थांचा कायदा मंजूर झाले. ज्यामुळे सहकारी संस्थांचे कामकाज पारदर्शक आणि जबाबदार झालं. देशाच्या इतिहास प्रथमच केंद्रीय सहकार मंत्रालय निर्माण करुन त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे सहकाराचे अनेक प्रश्न सुटले. देशातील प्रत्येक नागरिक सहकाराशी कसा जोडला जाईल याला प्राधान्य देण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना समृद्धी देण्याचं काम सहकार विभागाने केल आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com