Delhi Crime : मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार
Delhi Crime : मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार; आईची पोलिसात धाव, मुलाला अटकDelhi Crime : मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार; आईची पोलिसात धाव, मुलाला अटक

Delhi Crime : मुलाकडूनच 65 वर्षीय आईवर दोनवेळा अत्याचार; आईची पोलिसात धाव, मुलाला अटक

दिल्ली धक्का: 65 वर्षीय आईवर मुलाकडून अत्याचार, मुलाला अटक.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राजधानी दिल्लीमध्ये आई–मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम मुलाने स्वतःच्या ६५ वर्षीय आईवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय आरोपी मुलाने आपल्या आईवर वारंवार मानसिक दबाव टाकत वडिलांपासून वेगळं होण्यासाठी भाग पाडलं. आईच्या चारित्र्यावरही आक्षेप घेत तिच्यावर चरित्रहीन असल्याचा आरोप करून तिला घटस्फोटासाठी जबरदस्ती केली. या अमानुष वर्तनानंतर नराधम मुलानं हद्द ओलांडत स्वतःच्या आईवरच दोन वेळा अत्याचार केला.

पीडित आईने धैर्य दाखवत अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे. सध्या पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

या घटनेमुळे दिल्लीसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आई–मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकाराने समाजमन सुन्न झालं आहे. वृद्ध आईवरच अत्याचार करणाऱ्या मुलाच्या कृत्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com