लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्यात पडून सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्यात पडून सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवलीतील परिसरातील धक्कादायक घटना
Published on

अमझद खान | कल्याण : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये लिफ्टसाठी खोदलेल्या खड्यात पडून एका सहा वर्षीय मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीतील घडली आहे. वेदांत जाधव असे या मुलाचे नाव असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. अशा प्रकारची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्यात पडून सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Uddhav Thackeray : 'काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती'

डोंबिवली पूर्व भागातील सांगर्ली परिसरात एका बहुमजली इमारतीचे काम सुरु आहे. या इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्याकरीता खड्डा खोदण्यात आला होता. या परिसरात राहणारा एक सहा वर्षीय मुलगा वेदांत जाधव या खड्यात पडून त्याचा मृत्यू झाला आहे. पाडा पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मुलाचा मृत्यू कधी आणि कशामुळे झाला आहे. हे पोलीस तपासाअंती समोर येणार आहे.

काही महिन्यापूर्वीच सागाव परिसरात असे एक बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये लिफ्टसाठी खोदलेल्या खड्यात पडून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेमध्ये पोलीस तपास करतील. त्र,घटनाग्रस्त इमारत बेकायदा कि अधिकृत याविषयीही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com