Mahayuti
Mahayuti

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू

विधीमंडळात पुढील दोन दिवसांत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • आज सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन

  • राज्यातील 288 आमदारांना विधानसभेकडून अधिवेशनाचे निमंत्रण

  • विधीमंडळात पुढील दोन दिवसांत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार

महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

महायुतीने राज्यात सरकार स्थापन केलं. याच पार्श्वभूमीवर आता आज सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडणार आहे. राज्यातील 288 आमदारांना विधानसभेकडून अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

विधीमंडळात पुढील दोन दिवसांत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार असून 7 व 8 तारखेला आमदारांचा शपथविधी पूर्ण होणार असून 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. राज्यपालांच्या दोन्ही सभागृहातील अभिभाषणाने अधिवेशनाची सांगता होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com