५० फूटावरुन कोसळला स्विंग जॉयराइड; 15 जण जखमी; व्हिडीओ व्हायरल

५० फूटावरुन कोसळला स्विंग जॉयराइड; 15 जण जखमी; व्हिडीओ व्हायरल

लहान मुले, महिलांसह 10 ते 15 जण जखमी

मोहाली : पंजाबमधील मोहाली येथे एका जत्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. स्काय स्विंग जॉयराइड अचानक तुटल्याने खाली आदळले. यामुळे लहान मुले, महिलांसह 10 ते 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पंजाबमधील मोहाली येथील दसरा मैदानावर रविवारी जत्रा भरली होती. परंतु, स्विंग जॉयराइडचा मोठा अपघात झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याममध्ये स्विंग जॉयराइड फिरताना दिसत असून नंतर हळूहळू वर जाताना दिसत आहे. एका ठराविक उंचीवर तो थांबतो आणि फिरत राहतो. पण, नंतर हळूहळू खाली येण्याऐवजी स्विंग जॉयराइड अचानक वेगाने आदळते.

उंचीवरुन स्विंग जॉयराइड पडल्याने अनेक लोक खुर्च्यांवरून उडाले. यावेळी मोठा आवाज देखील झाला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेत सुमारे 10 ते 15 जण जखमी झाले असून त्यांना मोहाली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, जत्रेत एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती आणि आयोजकांचे दुर्लक्ष होते, असेही पोलिसांनी म्हंटले आहे,

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com