पुण्यात मंगळवार पेठेत भीषण आग
Admin

पुण्यात मंगळवार पेठेत भीषण आग

पुण्यात मंगळवार पेठेत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

पुण्यात मंगळवार पेठेत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवार पेठेत असलेल्या जुन्या बाजारामधील दुकानांना आज सकाळी अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.या भागात वायरिंग, इलेक्ट्रिकल, लाकडी फर्निचर अशा वस्तूंची अनेक दुकानं आहेत.अग्निशमन जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र, अद्याप आग कशामुळे लागली याचं कारण समजू शकलेलं नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com