सांगलीच्या वसगडे येथे रेल्वेचे इंजिन रूळावरून घसरले

सांगलीच्या वसगडे येथे रेल्वेचे इंजिन रूळावरून घसरले

पलूसच्या वसगडे येथील घटना,रेल्वेसह इतर वाहतुकही ठप्प...

संजय देसाई| सांगली: मिरज-पुणे रेल्वे मार्गावर सांगलीच्या वसगडे या ठिकाणी रुळावरून रेल्वे इंजिन घसरल्याचा प्रकार घडलेला आहे.सध्या पुणे- मिरज- लोंढा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण काम युद्धपातळीवर सुरू आहे.याच दुहेरीकरणासाठी विद्युत केबल कामासाठी आलेल्या इंजिनचे चाक अचानकपणे रुळावरून घसरले आहे.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना झालेली नाही इंजिनची काही चाकच हे रुळावर घसरले आहेत.यामुळे मुंबई-पुणे -मिरज रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.अडीच तासांपासून युद्धपातळीवर रेल्वे रुळावरून घसरलेले चाक दुरुस्तीचे काम रेल्वे विभागाकडून सुरू आहे.तर वसगडे येथील रेल्वे गेट जवळच हा प्रकार घडल्यामुळे सांगलीहून कडेगाव मार्गावरील वाहतूक देखील ठप्प पडली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com