Ratnagiri
Ratnagiri Team Lokshahi

अलोरे येथील यांत्रिकी विभागाच्या कार्यालयावर कोसळले झाड

मोठ्या प्रमाणत झाली वित्तहानी,कार्यालयवरील पत्रे दुरुस्ती काम मंजूर असूनही कामात का होतय विलंब
Published by :
Sagar Pradhan

निसार शेख|शिरगाव: अलोरे येथील यांत्रिकी विभागाच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसात झाड कोसल्यामुळे संगणक इतर साहित्य आणि पत्र्याची मोडतोड होऊन लाखोंचं नुकसान झाली आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी कार्यालयामध्ये कर्मचारी उपस्थित नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सदर कार्यालयाचे पत्रे दुरुस्ती काम करण्याचे टेंडर झाले असताना देखील कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम सुरू आहे. याबाबत नेहमी स्वतःहा कोयना सिंचन विभाग कार्यकारी अभियंता पोतदार यांनी पाहणी करून सुध्दा कामात दिरंगाई होत आहे. तसेच शासकीय कार्यालय जवळ असलेली झाडे तोडण्यासाठी वन विभाग यांची रितसर परवनगी घ्यावी लागते. मात्र, नेहमी पाठ पुरावा करून देखील ही जीवघेणी झाडे तोडण्यासाठी विलंब का झाला? कर्मचाऱ्यांबाबत एखादी वाईट घटना घडल्यानंतर अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. सदर कार्यालयाचे काम लवकरात लवकर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारी देत आहेत. मात्र, कार्यालयीन कामकाजामध्ये झाड कोसळण्याची घटना घडली असती आणि जिवीत हानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवाल विचारण्यात येत आहे. तर सदर कार्यालयाचे पत्रे दुरुस्ती करण्याचे काम मंजूर झाले असताना ते अद्याप का करण्यात आले नाही त्यामध्ये नेमके काय गोड बंगाल आहे? याविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com