ताज्या बातम्या
Jalgaon Pregnant Women : रुग्णवाहिका तर सोडा डॉक्टरही उपलब्ध होईना, रस्त्यातचं गरोदर महिलेची प्रसुती
जळगाव जिल्ह्यातील बोरमळी गावात अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसुती झाली.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावात आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसुती झाली. आदिवासी गावाच्या महिलेला अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने तिच्या पतीने मोटरसायकलवर दवाखान्यात नेत असताना वैजापूर गावाजवळील रूग्णालय अवघ्या 1 किलोमीटरवर असताना वाटेतच तिची प्रसुती झाली.
धक्कादायक म्हणजे तब्बल अडीच तास महिला आणि बाळ रस्त्यावर तात्कळत होते तरीसुद्धा रुग्णालयातील साधी परिचारिकाही तेथे पोहोचली नाही. जळगाव जिल्ह्यात एक केंद्रीय राज्य मंत्री व महाराष्ट्राचे दोन कॅबिनेट मंत्री असताना ही घटना घडने म्हणजे महाराष्ट्राने शरमेने मान घाली घालायला लावणारी आहे .