माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पैठण शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

सुरेश वायभट | पैठण | पैठणमध्ये पाण्यासाठी नागरीक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पैठण शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरातील काही भागात नळाला वेळेवर पाणी येत नाही, तर काही ठिकाणी दुषित पाणी पुरवठा होतं. नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने माजी नगरसेवक सोमनाथ परळकर यांच्यासह नागरिकांनी नगरपालिका समोर बँन्ड वाजवत आंदोलन करण्यात आले.

धरण उशाला आणि कोरड घशाला अशी काही परिस्थिती पैठण शहरातील नागरिकांची झाली आहे. शहरात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचे निवेदन नगरपालिका अधिकार्यांना देण्यात आले. पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही मोठंआंदोलन करणार असल्याचा इशारा परळकर यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com