Maharashtra Board (MSBSHSE) 2026 Exams
Maharashtra Board (MSBSHSE) 2026 Exams Maharashtra Board (MSBSHSE) 2026 Exams

Maharashtra Board (MSBSHSE) 2026 Exams : मोठी बातमी! 12 वीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय, विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिटाबाबत महत्त्वाची अपडेट

12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून ती 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Maharashtra Board (MSBSHSE) 2026 Exams : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. 12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून ती 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे.

विद्यार्थ्यांची बराच दिवसांची प्रतीक्षा संपली असून बारावीची हॉल तिकिटे आता उपलब्ध झाली आहेत. ही हॉल तिकिटे ऑनलाइन स्वरूपात देण्यात येणार असली, तरी महाविद्यालयांनी ती प्रिंट करून विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे. यासाठी कोणतेही शुल्क घेता येणार नाही.

हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांची सही व शिक्का असणे अत्यावश्यक आहे. सही नसलेले हॉल तिकिट ग्राह्य धरले जाणार नाही आणि अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हॉल तिकिट तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांतून परीक्षा घेतली जाणार आहे. लवकरच दहावीच्या विद्यार्थ्यांनाही हॉल तिकिटे मिळणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, परीक्षा कॉपीमुक्त ठेवण्यासाठी मंडळाने कडक पावले उचलली आहेत. दहावीची 31 आणि बारावीची 76 परीक्षा केंद्रे रद्द करण्यात आली असून, सर्वाधिक कारवाई छत्रपती संभाजीनगर विभागात झाली आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, भरारी पथके यांची कडक नजर असणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षा शांतपणे द्याव्यात, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

थोडक्यात

🔹 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत घोषणा
🔹 बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर
🔹 12 वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू
🔹 परीक्षा 18 मार्च 2026 पर्यंत चालणार
🔹 सर्व परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार
🔹 विद्यार्थ्यांनी हॉल तिकिट व वेळापत्रक तपासण्याचे आवाहन

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com