ताज्या बातम्या
Ranjit Kasle Viral Video : 'बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट'; रणजित कासलेचा मोठा दावा
वाल्मिक कराडला स्पेशल मेजवानी: रणजीत कासलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बीड जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा खळबळजनक दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेनं केला आहे. सध्या कासले जामीनावर बाहेर आहे. याबाबत त्यानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात कराडची जेलमध्ये कशी बडदास्त ठेवली जाते. हे कासलेनं सांगितलंय अगदी स्पेशल चहापासून ते चपाती आणि चिकनची मेजवानी कराडला मिळत असल्याचा आरोप कासलेनं केला आहे. एन्काऊंटर प्रकरणी खळबळजनक दाव्यांनंतर कासलेला अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्याला बीडच्या जेलमध्ये ठेवलं होतं. त्याच जेलमध्ये वाल्मिक कराड असल्याचं कासलेनं सांगत एक व्हिडीओ बनवला आहे. त्याचबरोबर कराडला नागपूरच्या जेलमध्ये हलवण्याची मागणीही कासलेनं केली.