कचरा वेचणाऱ्या एका महिलेच्या अंगावर मेट्रोच्या ब्रिज ची प्लेट पडल्याने मृत्यू
Admin

कचरा वेचणाऱ्या एका महिलेच्या अंगावर मेट्रोच्या ब्रिज ची प्लेट पडल्याने मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात मेट्रोचे जोरदार काम सुरू आहे.

शुभम कोळी, ठाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात मेट्रोचे जोरदार काम सुरू आहे. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे मेट्रोचे काम सुरू आहे. याच परिसरात एका अज्ञात महिलेच्या अंगावर मेट्रोच्या ब्रिजची प्लेट पडून तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची पाहणी आणि शहनिषा केल्या नंतर पोलिसांना मयत झालेली ही अज्ञात महिला कचरा वेचानारी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात आले आहे.

कचरा वेचात असताना ती मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात उतरली आणि त्याचवेळी तिच्या अंगावर ही प्लेट पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेची चौकशी करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com