J J Hospital : जे. जे. रुग्णालयाच्या वसतिगृहात 22 वर्षीय विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, 'हे' कारण आलं समोर
मुंबईतील भायखळा येथील जे. जे. रुग्णालयाच्या वसतिगृहात रोहन प्रजापती या 22वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.बराच वेळ रूमचा दरवाजा वाजवून ही आतून काही प्रतिसाद न आल्याने रोहन च्या मित्रांना संशय आला आणि दरवाजा तोडल्यावर रोहन रूम च्या छताला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. घरची आर्थिक परिस्थिती आणि अभ्यासाचा ताण यामुळे रोहनने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घटनेने जे जे रुग्णालयातील वसतिगृहामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी रात्री दहाच्या सुमारास रोहन ने वसतिगृहामधील आपल्या खोलीमध्ये पंख्याला गळफास लावून घेतला त्यानंतर त्याला डॉक्टरांनी रात्री बारा वाजता मृत घोषित केले.जे. जे. मार्ग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रोहन ला अभ्यासाचे खूप टेन्शन होते त्याचबरोबर त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती ही फारशी चांगली न्हवती. सोमवारी तो त्याच्या रूम मधून बाहेर ना आल्यामुळे त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे शेवटी दरवाजा तोडण्यात आला तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला.
त्यांच्या मित्रांनी रोहन ला या अवस्थेत पाहिल्यानंतर वसतिगृहाच्या वार्डन ला लगेच सांगितले. आणि तात्काळ त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले मात्र रात्री बारा वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांवरील ताण आणि दबावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.