Solapur News : धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी; तरुणाने संपवलं जीवन

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील कुसळंब गावातील एका तरुणाने ऑनलाइन गेमच्या व्यसनाने कर्जबाजारी झाल्यानंतर आयुष्य संपवले आहे.
Published by :
Team Lokshahi

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील कुसळंब गावातील एका तरुणाने ऑनलाइन गेमच्या व्यसनाने कर्जबाजारी झाल्यानंतर आयुष्य संपवले आहे. चक्री गेमच्या नादात कर्जाचा डोंगर झाल्याने समाधान तुकाराम ननवरे (वय 32) या तरुणाने शुक्रवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ऑनलाइन गेमच्या जुगाराने आणखी एक बळी घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com