Godavari River : गडचिरोलीत गोदावरी नदीत 8 तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना, 6 जण अजुनही बेपत्ता
गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात गोदावरी नदीत काल सायंकाळी 5 वाजता आठ तरुण अंघोळीसाठी गेले असता ते आठही मुले नदीच्या पाण्यात बुडाले. त्यापैकी सहा तरुण पाण्यात बेपत्ता झाले असुन दोन तरुणांना वाचवण्यात यश आले आहे. तेलंगणाच्या अंबडपल्ली येथील ही घटना असुन शोध मोहीम सुरू आहे. पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने हे तरुण पाण्यात वाहून गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागातुन गोदावरी नदी वाहते. तेलंगणा च्या हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेले 8 जण बेपत्ता झाले आहे. या 8 युवकांपैकी 2 जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. मात्र 6 जण अजुन ही बेपत्ता आहेत. गोदावरी नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असतो. या तरुणांना प्रवाहाचा अंदाज आला नसल्यामुळे ही घटना घडली. हे सर्व बेपत्ता युवक 20वर्षांखाली आहेत.
यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि त्यांच्या मदतीमुळे दोन युवकांना बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेत सहा युवकांचा अजूनही पत्ता लागला नसून, बेपत्ता झालेल्या युवकांचा शोध घेण्यासाठी गोदावरी नदीच्या काठावर शोध सुरू आहे. सध्या जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीचं पाणी वाहतं आहे, या पाण्यात ती मुले वाहुन गेली असावी असा अंदाज लावण्यात आला आहे.