“आज काही आव्हान देणार नाही..." एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंच्या शुभेच्छा; म्हणाले...

“आज काही आव्हान देणार नाही..." एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंच्या शुभेच्छा; म्हणाले...

९ फेब्रुवारीला आज मुख्यमंत्री शिंदेंचा वाढदिवस आहे.

९ फेब्रुवारीला आज मुख्यमंत्री शिंदेंचा वाढदिवस आहे. सध्या आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोज रोज काय आव्हान द्यायचं. आज सुद्धा आदित्य ठाकरे यांना बिडकीन येथील सभेला जाण्यापूर्वी माध्यमांनी प्रश्न विचारला की, आज कोणते आव्हान देणार?

यावर उत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले की, वाढदिवसानिमित्त आम्ही जगात सर्वांनाच शुभेच्छा देत असतो. आमची सवय आहे की, आम्ही कुणाचेही वाईट बघत नाही. आमच्या पाठीत कुणी खंजीर खुपसले असतील, पाठीत वार केले असतील तरी देखील आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही. नेहमी आमच्याच शुभेच्छा सर्वांसोबत असतात. आज काही आव्हान देणार नाही. असे ते म्हणाले.

आज औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन येथे आदित्य ठाकरेंची सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात केले आहेत. औरंगाबादचे पोलीस अधिक्षक मनिष कलवानीया हे स्वतः बिडकीन येथे उपस्थित आहेत. सभेच्या ठिकाणी अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सभेला येणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com