Aditya ThackerayTeam Lokshahi
बातम्या
आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; सरळ सांगूनच टाकले की, एकनाथ शिंदे आमच्या घरी येऊन रडले आणि...
हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आता राजकीय वातावरणात चर्चा रंगल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. एकनाथ शिंदे यांनी बंड का केले? यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलं आहे. भाजपसोबत गेलो नाहीतर मी तुरुंगात असेन, असे त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील. असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.