ताज्या बातम्या
Aaditya Thackeray On CM Shinde : 'मिंधे आणि भाजप गटाची निवडणुका घेण्याची तयारी नाही'
मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित झाली आहे. यावरच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित झाली आहे. 9 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र, आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तर, यावरच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी 'मिंधे आणि भाजप गटाची निवडणुका घेण्याची तयारी नाही', अशी टीका करत प्रतिक्रिया दिली आहे.