या महाराष्ट्रद्वेष्ट्या राज्यपालांना त्यांनी बदलून दाखवावं; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना आव्हान

या महाराष्ट्रद्वेष्ट्या राज्यपालांना त्यांनी बदलून दाखवावं; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना आव्हान

शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणुक लढण्याचे आव्हान दिले होते.

शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणुक लढण्याचे आव्हान दिले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानामुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरेंना शिंदे गटाने ठाण्यात लढण्याचे प्रतिआव्हान दिले होते.

त्यावर आदित्य ठाकरेंनी या आव्हानाला होकार देत पुन्हा चॅलेंज दिले होते. यावर उत्तर देत एकनाथ शिंदे म्हणाले होते की, तुम्ही कोणाला आव्हान देता. काही लोक रोज सकाळी गद्दार गद्दार म्हणतात. मी छोटं आव्हान स्वीकारत नाही. मी मोठी आव्हाने स्वीकारतो,असे ते म्हणाले.

यावर पुन्हा प्रतिउत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले की, काल मी त्यांना म्हटलं वरळीतून निवडणूक लढवून दाखवा. त्यावर काही उत्तर आलं नाही. मग मी त्यांना म्हटलं वरळीतून नाही, तर ठाण्यतून माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा. तिथे मी यायला तयार आहे. पण आज मी त्यांना अजून एक आव्हान देतोय. माझी पहिली आव्हानं त्यांना स्वीकारायची नसतील, माझ्यासमोर लढायची त्यांच्यात ताकद नसेल, हिंमत नसेल, तर एक सोपं आव्हान मी त्यांना देतो. येत्या अधिवेशनात राज्यपालांचं अभिभाषण होण्याआधी या महाराष्ट्रद्वेष्ट्या राज्यपालांना त्यांनी बदलून दाखवावं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com