Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

"...कंत्राटदार मित्रांसाठी रेसकोर्सचा बळी"; आदित्य ठाकरेंचा CM एकनाथ शिंदेंवर मोठा आरोप

महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जागा आणि सागरी किनारा मार्गालगत असलेली १८० एकर जागा अशा एकूण ३०० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बांधण्यात येणार आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Aaditya Thackeray Tweet : महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जागा आणि सागरी किनारा मार्गालगत असलेली १८० एकर जागा अशा एकूण ३०० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बांधण्यात येणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यताही देण्यात आली आहे. परंतु, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी याविषयी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

आदित्य ठाकरे ट्वीटरवर काय म्हणाले?

रेसकोर्स आधीच मोकळी जागा असताना अजून मोकळी कशी होणार?मुंबईकरांना 'थीम पार्क' नकोय, पण कंत्राटदार मंत्री (CM) मात्र त्यांच्या बिल्डर - कंत्राटदार मित्रांसाठी रेसकोर्सचा बळी देत आहेत. आजवर अमाप देणाऱ्या पक्षाच्याच पाठीत वार करून पळून गेलेल्या माणसावर मुंबईकर विश्वास ठेवतील का? मूळात अशी गद्दार व्यक्ती आश्वासनं पाळेल का? महाराष्ट्राचं नुकसान करणाऱ्या ह्या गद्दारांवर कोणी भरोसा करेल का? त्यात, रेसकोर्समध्ये ४ वर्ष खोदकाम, काँक्रीट आणि माती टाकून भूमिगत कार पार्क करण्याची त्यांची इच्छा आहे.त्यांना मुंबईतल्या क्लब आणि मोकळ्या जागांवर ताबा मिळवण्यासाठी तिथे चेअरमन आणि सदस्य म्हणून त्यांचीच माणसं घुसवायची आहेत.माझा साधा प्रश्न आहे, भाजप मुंबईचा इतका द्वेष का करते?मुंबईची ही लूट कशासाठी?

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com