आदित्य ठाकरेंची जागतिक भरारी; 2023 मधले सर्वाधिक आश्वासक युवा नेते म्हणून गौरव

आदित्य ठाकरेंची जागतिक भरारी; 2023 मधले सर्वाधिक आश्वासक युवा नेते म्हणून गौरव

आदित्य ठाकरेंची जागतिक भरारी; 2023 मधले सर्वाधिक आश्वासक युवा नेते म्हणून गौरव

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 2023 च्या ग्लोबल यंग लीडर्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यंदाच्या यादीत राजकीय नेते, उद्योजक, खेळाडू, संशोधक यांच्यासह 100 जणांचा समावेश करण्यात आला आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (डब्ल्यूईएफ) या वर्षासाठी जगातील 40 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या तरुण नेत्यांच्या यादीची घोषणा केली आहे. यासाठी नेत्यांची यादी 2004 पासून तयार केली जाते. यात 120 देशांतील 1,400 सदस्यांचा समावेश आहे. विविध क्षेत्रातील युवा, समाजासाठी त्यांनी केलेले कार्य आदी गुणांच्या आधारे ही यादी तयार करण्यात येते.

बायोझिनचे सीईओ बी. जोसेफ, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई आणि पॉलिसी ४.० रिसर्च फाऊंडेशनच्या सीईओ तन्वी रत्ना, सुदर्शन वेणू, जिओ हॅप्टिक टेक्नोलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकृत वैश, यांचासुद्धा या यादीत समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com