Lokshahi Marathi Live
Lokshahi Marathi Live

Latest Marathi News Update live : इस्त्रोचं श्रीहरी कोटामधून ऐतिहासिक प्रक्षेपण

Marathi Live Headlines Updates: आज सोमवार, दिनांक 24 डिसेंबर 2025, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

इस्त्रोचं श्रीहरी कोटामधून ऐतिहासिक प्रक्षेपण

अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी अंतिम टप्प्यात

अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी अंतिम टप्प्यात, शेवटच्या क्षणी घोषित होणार...बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा विशेष प्लॅन तयार;अंतिम यादीतील उमेदवारांशी थेट संपर्क साधणार नेतृत्व... मित्रपक्षांना जागावाटप करताना भाजपकडून कडक भूमिका. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्षांतर्गत तणाव वाढला,भाजपकडून निवड झालेल्यांनाच तिकीट देण्यावर भर. नाराज इच्छुकांना शांत ठेवण्यासाठी समजूत काढण्याची तयारी. अमरावती महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग.

2 दशकानंतर ठाकरे बंधू राजकीय पटलावर एकत्र

20 वर्षापासून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्हीही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मनापासून प्रबळ अशी इच्छा होती. ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, आज ती पूर्ण होणार आहे. याचा निश्चितच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आनंद होणार आहे.

मुंबईत वंचित बहुजन आघाडी 200 जागांवर लढण्यास सज्ज – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही स्वबळावर लढण्याची संपूर्ण तयारी केली आहे. सुमारे 200 जागांवर उमेदवार उभे करण्याचा आमचा निर्धार आहे,” असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. संघटनात्मक बांधणी, प्रभागनिहाय आढावा, कार्यकर्ता प्रशिक्षण आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित निवडणूक कार्यक्रम आखण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

विजय मल्ल्या भारतात परत येणार की नाही असा मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

विजय मल्ल्या यांनी भूमिका स्पष्ट करावी न्यायालयाचे आदेश. जोपर्यंत मल्ल्या भारतीय न्यायालयांच्या अधिकारी क्षेत्रात स्वतःला सादर करत नाही तोपर्यंत फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या वैधतेला आव्हान देण्याच्या त्याच्या याचिकेवर सुनावणी घेतली जाणार नाही. यासंदर्भातील पुढील सुनावणी 12 जानेवारी रोजी पार पडेल

ब्लू सी बँकवेट येथे पत्रकार परिषद घेऊन करणार युतीची घोषणा

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्यायुतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरला आज दुपारी 12 वाजता ब्ल्यू सी हॉटेलमध्ये आज ठाकरे बंधूंच्या युतीची पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वरळी येथील ब्लू सी बँक्वेट येथे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.

नालासोपारा येथे हिंदू समाजाचा बांगलादेश अत्याचार विरोधी मोर्चा

पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात नालासोपारा येथे जोरदार निषेध करण्यात आला. बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार आणि कथित मानवाधिकार उल्लंघनाच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदू संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. निदर्शनादरम्यानचे वातावरण पूर्णपणे संतप्त झाले होते. हातात फलक घेऊन कार्यकर्त्यांनी ‘बांगलादेशातील हिंदूंच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनावर जग गप्प का आहे?’, ‘बांगलादेशातील दलित समाजावरील अत्याचार थांबवा’, ‘अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार थांबवा’, ‘आम्ही हिंदूंवरील अत्याचार सहन करणार नाही’ अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला. बांगलादेशातील हिंदू समाजावर होणारे अत्याचार ही गंभीर चिंतेची बाब असून, त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने मौन बाळगणे दुर्दैवी असल्याचे सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भटक्या श्वानांना खाद्य देण्यापासून रोखणे गैर नाही

पुण्यातील एका सोसायटीच्या गेटवर भटक्या कुत्र्यांना खायला घालताना रोखणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दखल करण्यात आला होता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यामुळे अडथळा होत असेल तर रोखणाऱ्या नागरिकांची चूक नाही म्हणत त्यांच्यावरील गुन्हा न्यायालयाने रद्द केला. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर पार पडली सुनावणी

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक

यादीमध्ये कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, तेलंगणाचे मंत्री आणि क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन, अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर , तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री सचिन पायलट, कन्हैय्या कुमार यांचा समावेश

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com